गावातील एकूण मंदिरे

दाढ बु गावात एकूण 21 मंदिरे आहेत। त्यातील ठराविक मंदिरांचे नावे मी येथे देत आहे।

 1. सद्गुरू संत मुकूंददास महाराज मंदिर (प्रवरा नदीच्या पााात मधोमध आहे)
 2. आदनमदन बाबाचे मंदिर (सर्व धर्म समभावाची शिकवण देणारे )
 3. बिरोबाचे मंदिर (जागृत देवस्थान )
 4. हनुमान मंदिर
 5. कानिफनाथ मंदिर
 6. दत्तााय महाराज मंदिर
 7. सप्तश्रृंगी मंदिर
 8. वरखेडची आई मंदिर
 9. श्री स्वामी समर्थ मंदिर (बालसंस्कार केंद्र दाढ बु )
 10. संताजी महाराज जगदाडे
 11. मंबादेवी मंदिर
 12. शिवालय मंदिर
 13. नरहरि महाराज सोनार मंदिर
 14. जगत्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर
 15. संत गोरोबा मंदिर
 16. लक्ष्मी माता मंदिर
 17. चर्च
 18. मस्जिद

संत मुकुंददास महाराज यांची आख्यायिका
संत मुकुंददास महाराज पानोडि (शिबलापुर) महाराज वयाच्या 7 वर्षी दाढ बु या गावात आले पंढरपुरची पायी वारी ते महिण्याची करत असे पंढपुर मध्ये त्यांनी एक चमत्कार दाखविला पंढरपुरमध्ये एक गंगुकाकूचा वाडा होता।त्या वाडयात कोणी राहत नसे धोंडोपंत दादांनी तो वाडा संत मुकूंददास महाराजांकडे दिला त्या वाडयात एकही वारकरी जिवंत राहात नसे। महाराजाकडे अखंड विण्याची पाळी आली महाराजांनी नेहमी प्रमाणे वीणा हतात घेतला आणी आपले भजन चालु केले त्या वाडयातील ब्रम्हराक्षस समोर आला व महाराजांना त्रास देवू लागला पण महाराज भगवंताच्या नामात दंग होते। राक्षसाचा महाराजांवर काहीही परिणाम झाल नाही शेवटी राक्षस महाराजांना शरण आला व राक्षसाने जागा मागितली मंग महाराजांनी त्याला चंद्रभागेच्या डोहात जागा दिली ।पण जेव्हा तु चंद्रभागेच्या डोहात जाशील तेव्हा मला कसे समजेल तेव्हा तु काहीतरी आवाज कर तेव्हा राक्षस चंद्रभागेच्या डोहात गेला व एक मोठी उडी घेतली उडी घेतल्यानंतर त्या पाण्याचा आवाज इतका मोठा झाला कि संपुर्ण पंढरी दणनुन निघाली कुणालाच काही कळेना तेव्हा गावातील वारकयांना वाटले महाराजांना मारले गेले मंग धोडपंतदादा व वारकरी वाडयात आले वाडयाला आतुन कडी लावलेली होती। यांनी दरवाजा उघडला तर महाराज आत मध्ये भगवंताच्या नामात लीन झालेले होते। मंग धोंडोपंत दादांनी मस्तकावर हात ठेवला व महाराज शुदधीवर आले। तेव्हा महारांजानी सांगितले की तो आवाज ब्रम्ह राक्षसाचा होता। तो आता कधीही इकडे येणार नाही ।मंग धोडोपंत दांदानी त्या ब्रम्ह राक्षसाची  मांडणुक चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर केली । व तेव्हा पासुन आज पर्यत तेथे अखंड वीणा चालु आहे।त्या वीण्याचा मान दाढ बु येथील रामदास बाबा बैरागी बाबुराव बाबा रामबाबा अशी एकूण 4 पीढया अखंड वीणा चालु आहे। दाढ बु या गावात 15

बाबांचे चमत्कार

 1. महिण्याची पायी वारी करत असताने बाबा नेहमी जेवणासाठी जोगेश्वरी आखाडयावर थांबत असे।पण एका वारीला बाबा तेथे गेल्यावर त्या महिलेचे मुल वारलेले होते पण त्या मातेला वाटले की आता बाबाना निरमुखी कसे पाठवावयाचे मंग तीने स्वयपांक केला व मुला झाकून ठेवले बाबांना जेवण्यास मातेने ताठ केले बाबांनी विचारले मुलगा कोठे आहे। मातेने सर्व खरी माहिती बाबांना सांगितली व बाबांनी मंग मातेला सांगितले की जा मुलाला जेवायला बोलवा तेव्हा तो मुलगा जेवायला आला हे पाहुन माता अंचबित झाली।
 2. महाराज वयस्कर झाले होते । तेव्हा त्यांनी पायी वारी करण्यासाठी एक घोडा आणला व ते त्या घोडयावर महिण्याच्या वारीला जात असे। वारीहुन आल्यावर तो घोडा कोठे जात असे कुणालाही कळत नसे पण बांबाची वारी आली की घोडा दाढ बु गावात बाबांच्या वास्तव्यासमोर येवून उभा राहात असे । अशा पदध्तीने या मंदिराचा महिमा आहे।

आदनमदन बाबा मंदिर
प्रत्येक वर्षी गुढीपाढवा झाल्यानंतर 5 व्या दिवशी  संदल आदनमदन बाबाची चादर भव्य अशा गजरनामात मिरवणूक निघते। या मिरवणुकित विविध धर्माचे लोक सहभागी होतात। येथील वैशिष्टे म्हणजे सर्व धर्म समभावाची शिकवण नगर जिल्हयाला करून दिलेली आहे।कुठल्याही प्रकारचे भांडणे येथे होत नाही। आदन मदन बाबांच्या मंदिरात कालीकामाता या ग्रामदेवतेचे मंदिर आहे।
6 व्या दिवशी यात्रोत्सव असतो या दिवशी रात्री ठिक 11 वाजता तकतराव (छबीना) निघतो। या  छबीनाची ढोल ताशाच्या गजरात भव्य अशी मिरवणुक  पहाटे 4 वाजेपर्यंत चालते। त्यानंतर संदर अशा शोभेच्या दारूची जवळजवळ 1 तास अशी आतषबाजी होते। रात्री 9 ते 3 या दरम्यान लोक करमणुकीसाठी वेगवेगळे लोकनाटय (तमाशा मंडळ ) सादरीकरण असते।
7 व्या दिवशी ठिक सकाळी 8।30 ते 12 वाजेपर्यंत वेगवेगळया लोकनाटयाची हजेरी असते ।4 वाजेच्या दरम्यान भव्य अशा कुसत्यांचा हंगामा प्रवरा नदी पात्राच्या वाळवंटात  भरतो। या मध्ये लांबलाबुन येणाया पहिलवानांची (मल्ल)दखल घेवून त्यांच्या कुसत्या लावल्या जातात व त्यांना योग्य असे मानधन दिले जाते।