मन आनंदुनी जाई

प््रावरेच्या काठावर दाढ गांव ते सुंदर
रम्य त्याचा परिसर
मन आनंदुनी जाई।
दाढ गावात शिरता  आहे बिरोबा जागता
पायी त्याच्या लीन होता
दुख निवारण होई।

बाबा आदनमदनशेजारी हनुमान
हिंदु आणि मुसलमान
साक्ष एकतेची देई
आहे प्रवरेच्या तिरी जणु पंढरी दुसरी
समाधिस्त हरीदास संत मुकूंददास मुरारी
शेजारीच शिवालय भव्य दिव्य देवालय
इथे येणारा जाणारा
श्वास सुटकेचा घेई।
गांव जरी भाविकाचा नाही तोटा शौकीनांचा
परी सुखी ज्याच्यात्याचा
गुण्या गोविंदाने राही।
न्हावीकुंभारचांभारतेलीलोहारसुतार
जो तो आपल्या कामात
नाही भांडण लढाई।
कृपा येथे शारदेची सोय उच्च शिक्षणाची
माहिती अन् तंाज्ञान
ज्ञान जगताचे देई।
गांवातले कारभारी न्याय निवाडा ते करी
नाही कुणी शिरजोरी
सारे ठिकठाक होई।
सुखी येथे शेतकरीकामगारकर्मचारी
दुकाने अन् दवाखाने
इथेसारे सुख सोई
प्रवरेच्या काठावर दाढ गांव ते सुंदर
रम्य त्याचा परिसर
मन आनंदुनी जाई
मन आनंदुनी जाई।